‘हिटलर’शाही विरोधात आम्ही लढा सुरूच ठेऊ : मनसे

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी कडून नोटीस बजावण्यात आली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे कळत आहे. आता हळूहळू यावर मनसे नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी ईडीच्या या नोटीसवर विचारले असता ते म्हणतात, सरकार विरोधातील लोकांवर दवाब टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत गेल्या पाच सहा वर्षांमध्ये ईडीने एकही भारतीय जनता पार्टीच्या लीडरवर कारवाई केलेली नाही.

राज ठाकरे यांनी लोकसभेला मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्र घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते आणि येत्या काळात राज ठाकरे सरकारविरोधात ईव्हीएम संधर्भात मोठे आंदोलन करणार असल्याने ही कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचे बोलले जात आहे. कोहिनुर मिलबाबत ईडीने मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांनासुद्धा नोटीस पाठवली आहे. मात्र आम्ही देशातील हिटलरशाही विरोधात लढतच राहू असे संदीप देशपांडे यांनी यावेळी म्हंटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त-