आता घरमालकही सरकारच्या ‘रडार’वर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नव्या धोरणानुसार आता घरमालकही शासनाच्या रडारवर येणार आहेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यासाठी केंद्र सरकार आता नवीन कायदा तयार करीत आहे. त्यासाठी ‘मॉडेल रेंट अँक्ट’साठी लागणारी माहिती स्थानिक प्रशासनाकडून शासन स्तरावरून घेण्यात येत आहे. परिणामी या नवीन धोरणानुसार भाडेकरूंना काही अधिकार मिळणार आहेत तर घरमालकाला भाडेकरू राहत असलेल्या घरात प्रवेश करण्यासाठी भाडेकरूला पूर्वकल्पना द्यावी लागणार आहे.

नव्या कायद्याच्या विधेयकाचा मसुदा बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे. हा कायदा घरमालकांसाठी काहीसा कडक तर भाडेकरूंच्या हक्कांचे संरक्षण करणारा आहे. नवीन कायद्यामध्ये भाडेकरूला काही अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार घरदुरुस्ती, घर तपासणी किंवा तशाच एखाद्या कारणासाठी भाडेकरू राहत असलेल्या मालमत्तेत घरमालक प्रवेश करणार असेल, तर मालकाला त्याची पूर्वकल्पना द्यावी लागणार आहे.

नवीन कायद्यानुसार घरमालकालाही काही अधिकार मिळणार आहेत. त्यानुसार भाडेकरार संपूनही एखादा भाडेकरू घर रिकामे करत नसल्यास, घरमालक त्या भाडेकरूस प्रतिमहिना भाड्याच्या चौपट रक्कम घरभाडे म्हणून आकारू शकतो. हाच प्रकार जर दुकान, कार्यालयांसाठी घडत असेल, म्हणजेच भाडेकरू दुकानाची जागा करार संपूनही रिकामी करत नसेल, तर घरमालक पुढील दोन महिने संबंधित भाडेकरूस दुप्पट भाडे आकारू शकतो. तसेच त्यानंतर पुढील महिन्यासाठी भाड्यापोटी भाड्याच्या चौपट रक्कम आकारू शकतो.

घरभाडे करारानुसार घरमालक भाडेकरूला करार संपण्यापूर्वी घराबाहेर काढू शकत नाही. भाडेकरूने सलग दोन महिने घरभाडे दिले नाही, तरच हा नियम शिथिल करण्यात येईल. तसेच, भाड्याच्या घराचा चुकीच्या कारणासाठी वापर भाडेकरू करत नाही, तोपर्यंत त्याला बाहेर काढता येणार नाही. घरमालकाला भाडेकरूस २४ तास अगोदर नोटीस पाठवून कल्पना द्यावी लागेल. भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये करण्यात येणार्‍या नवीन कायद्यानुसार मालमत्ताधारक व्यक्तीला आपले घर, जमीन, भूखंड ,कार्यालय, दुकान आदी गोष्टी भाडेतत्त्वावर द्यायच्या असतील तर त्यासाठी हा कायदा महत्त्वाचा ठरणार आहे.

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या