मोदींचे मुखवटे घालूनच ‘त्यांच्या’साठी तयार होत आहे मिठाई !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे लोकसभा निवडणुकीवरून एक्झिट पोलवरून जाहीर होणाऱ्या आकड्यांमुळे विरोधकांची धाकधूक वाढलेली असताना भाजपच्या गोटात मात्र उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईत तर चक्क भाजपच्या एका उमेदवाराने विजयानिमित्त दीड ते दोन हजार किलो मिठाईची ऑर्डर दिली आहे.

विशेष म्हणजे ही मिठाई मोदींचे मुखवटे घालून तयार करण्याची अटही या उमेदवाराने कारागिरांना घातली आहे. गोपाळ शेट्टी असे भाजप उमेदवाराचे नाव आहे. तगडा राजकीय अनुभव असणारे शेट्टी हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात पुन्हा नशीब आजमावत आहेत.

काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना रिंगणात उतरवून परिवर्तनाचा दावा केला असला तरी राजकीय अनुभव दांडगा असणारे गोपाळ शेट्टी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. सध्या एक्झिट पोलचे आकडे जाहीर होत असताना गोपाळ शेट्टी यांनी मात्र विजय साजरा करण्यासाठी नियोजन सुरु केले आहे.

त्याचा एक भाग म्हणून गोपाळ शेट्टी यांनी दीड -दोन हजार किलोची मिठाई तयार करण्यासाठी कारागिरांनी मोदींचे मुखवटे घालूनच मिठाई तयार करावी अशी अट घालून बोरिवलीतील एका मिठाई दुकानदाराला ऑर्डर दिली आहे. शेट्टी यांच्या या आत्मविश्वासाचीच मतदार संघात चर्चा रंगत आहे.

Loading...
You might also like