५० वर्षीय पुरुषाकडून महिलेचा विनयभंग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी शुभेच्छा देणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन विनयभंग करणाऱ्या पन्नास वर्षीय पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना विठ्ठलनगर पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी ३६ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. रमेश दादुराव साळवे (५०, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) याच्या विरुद्ध दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन डे निमित्त पीडित महिलेने रमेश याला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर रमेश याने महिलेकडे वारंवार ‘तू मला व्हॅलेंटाईन डे ला विश का केलंस’ अशी विचारणा केली. तसेच महिलेशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार मागील तीन महिन्यांपासून सुरु होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.