बालेवाडी क्रीडा संकुलाच्या व्यवस्थापकाचा ‘डर्टी पिक्चर’ ; १२ वर्षीय खेळाडू मुलीचा केला विनयभंग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – नेमबाजीसाठी लागणारी गन घेताना आणि परत करताना प्रशिक्षणासाठी आलेल्या १२ वर्षीय खेळाडूचा विनयभंग करण्यात आला. पोलिसांनी बालेवाडी क्रीडा संकुलातील व्यवस्थापकाला अटक केली आहे. हा प्रकार १४ ते २० मे दरम्यान गन फॉर ग्लोरी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे घडला.

रुद्र चनवीर गौडा पाटील (२४, रा. साई चौक, पाषाण) असे अटक केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या ६८ वर्षीय आजीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बारा वर्षीय नातीने बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या गन फॉर ग्लोरी येथे नेमबाजीचा बेसिक कोर्स लावला होता. त्याच्या सरावासाठी ती नियमितपणे जात होती. सराव करण्यासाठी व्यवस्थापकाकडून गन घ्यावी लागते. ही गन घेताना व सराव झाल्यानंतर गन जमा करताना व्यवस्थापक पीडित मुलीशी अश्लील चाळे करीत असे. याबाबत मुलीने घरच्यांना सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर आजीने पोलिसात धाव घेतली. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.