मुलगा रुग्णालयात, तरीही ‘या’ महिला आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  – भाजपाच्या नवनिर्वाचित आमदार मोनिका राजळे यांचा मुलगा कबीर डेंग्युमुळे रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्यावर उपचार सुरू असताना आ. राजळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दोन दिवसापासून ते मतदारसंघातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.

आमदार मोनिका राजळे यांनी अकोला, पालवेवाडी, मोहज देवढे, जांभळी या गावाचा दौरा करून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत पहाणी केली. नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत. त्यांच्या मदतीसाठी तातडीने शासनाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

अकोले येथील बाळासाहेब डुकरे यांचे पाण्यामुळे जळून गेलेले पीक, पालवेवाडी येथील राजू पालवे यांचे पाण्यामुळे वाया गेलेले कपाशीचे पीक, हरिभाऊ कराड व साहेबराव आंधळे यांच्या शेतातील काढणीला आलेला सडलेला कांदा, देवराम पालवे यांचे भुईसपाट झालेले चाऱ्याचे पीक पाहून अामदारांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

Visit : Policenama.com