‘कावळे’, ‘मावळे’ गेले आता ‘राजे’ही जाण्याच्या मार्गावर, खा. अमोल कोल्हे साताऱ्यात ‘बरसले’ !

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप शिवसेनेने काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधून त्यांचे अनेक आमदारांना आपल्या पक्षात ओढून घेतले आहे. त्यांच्यावर टिका करताना अध्यक्ष शरद पवार यांनी कावळे उडून गेले उरले ते मावळे असा म्हटले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधून कावळे, मावळे तर गेलेच आहेत. आता राजेही जाण्याच्या मार्गावर असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा काल साताऱ्यात आली. त्यावेळी या यात्रेचे स्टार प्रचारक म्हणून घोषित झालेले खासदार उदयनराजे हेच अनुपस्थित होते. तसेच रामराजे निंबाळकर यांनीही या यात्रेला दांडी मारल्याने आता राजेही भाजपाच्या मार्गावर असल्याचे निश्चित झाल्याचे बोले जाऊ लागले आहे.

शिवस्वराज्य यात्रेची राष्ट्रवादी काँग्रेसने घोषणा केली तेव्हा त्याची सुत्रे खासदार अमोल कोल्हे व उदयनराजे यांच्याकडे सोपविली होती. पण दरम्यानच्या काळात उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे प्रसिद्ध झाले. तेव्हा साताऱ्यातील पूरग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी ही भेट असल्याची सारवासारव करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे अगोदरच भाजपावासी झाले आहेत.

शिवस्वराज्य यात्रेला अनुपस्थित राहून उदयनराजे आणि राम राजे निंबाळकर यांनी आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर जात असल्याचे संकेत दिले आहेत. साताऱ्यातील शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत याचे पडसाद उमटले नसते तर नवल. ज्यांना लढण्याची ताकद नाही, हिम्मत नाही ते पक्ष बदलत आहेत. सत्तापदाच्या एका तुकड्यासाठी लाचार होतायेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सातारच्या जाहीर सभेत केली.

शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव घेवून तर उदयनराजे यांचे नाव न घेता प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार यांच्या छायेत राहून लाल दिवा मिळाला ते सोडून गेले आहेत. वीक पॉईंटवर बोट ठेवून भाजप प्रवेश करुन घेत आहेत असा आरोप जयंत पाटील यांनी केला.  महाराष्ट्राचे ‘राजेपण’ काल पण… आजपण आणि उदयापण आपण एकाच व्यक्तीला देतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना असे सांगत खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजे, शिवेंद्रराजे, राम राजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला.

आरोग्यविषयक वृत्त –