… तर खा. डॉ. सुजय विखे, खा. सदाशिव लोखंडे ‘अपात्र’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह 19 उमेदवार व शिर्डी लोकसभा मतदार संघातील खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह 20 उमेदवारांनी 22 जूनपर्यंत आपला निवडणूक खर्च आयोगाकडे सादर करावा, असा आदेश निवडणूक खर्च निरीक्षक अजित मिश्रा यांनी उमेदवारांना दिला आहे. 22 पर्यंत खर्च सादर केला नाही, तर निवड अपात्र ठरविण्यात येईल, असा इशारा खा. विखे व खा. लोखंडे यांना दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभेचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची निवडणूक खर्चाबाबत बैठक घेतली. यावेळी मिश्रा यांनी ही सूचना केली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, नोडल अधिकारी अनारसे, महेश घोडके यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मिश्रा यांनी आयोगाच्या निर्देशाप्रमाणे भाग 1 ते 4 अनुक्रमी 1 ते 10 शपथपत्र व इतर खर्चाबाबत सुचना केली. या उमेदवारांना निवडणूक निकालानंतर 30 दिवसाच्या आत उर्वरित खर्च निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक आहे. हा खर्च सादर न केल्यास उमेदवाराला पुढील निवडणूक प्रक्रीयेत सहभाग घेता येणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. तर विजयी उमेदवारांना अपात्र ठरविले जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

नगर मतदार संघातील उमेदवारांनी 18 एप्रिलपर्यंत खर्च सादर केला असून, 19 उमेदवारांपैकी सर्वाधिक खर्च भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंनी 51 लाख 89 हजार 289 रुपये खर्च केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी 42 लाख 40 हजार 846 रुपये खर्च केला. या 19 उमेदवारांपैकी खर्चाच्या बाबतीत विखे अव्वल ठरले असून दोन्ही पक्षाने हा खर्च मान्य केला असल्याचे सांगण्यात आले आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी करण्यात आली होती. 19 एप्रिलपर्यंत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा निवडणूक आयोगाने परिगणित केलेला खर्च 30 लाख 8 हजार 673 रूपये आहे. तर लोखंडे यांनी घोषित केलेला निवडणुक खर्च 24 लाख 83 हजार 498 रुपये आहे. याशिवाय काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी आतापर्यंत 3 लाख 84 हजार 339 रुपये निवडणूक खर्च झाल्याचे घोषित केले आहे.

प्रत्यक्षात निवडणूक आयोगाच्या परिगणित केल्यानुसार कांबळे यांचा खर्च 8 लाख 8 हजार 644 रुपये झाला आहे. अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, भाकपचे उमेदवार बन्सी सातपुते, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखदान यांचा खर्चसुद्धा एक लाख रुपयांच्या पुढे गेला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like