आगामी वीस वर्ष मीच खासदार, राजकीय भविष्यवाणीमुळे खा. सुजय विखे ‘गोत्यात’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी वीस वर्षे नगर लोकसभा मतदार संघाचा मीच खासदार आहे. तुमची कामे करायची असतील, तर पुन्हा मला निवडून द्या, अशी भविष्यवाणी भाजपचे खासदार सुजय विखे यांनी केली आहे. त्यामुळे सुजय विखे हे भविष्यवाणीमुळे पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहेत.

नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे विकास कामांचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी खा. विखे बोलत होते. खासदार सुजय विखे हे नेहमी वेगवेगळी राजकीय विधाने करतात. पुढील 20 वर्षे मीच खासदार राहणार, असे म्हटल्यामुळे सुजय विखे यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

खा. विखे म्हणाले की, पुढचाही खासदार मीच आहे. तुमची कामे करायची असतील, तर पुन्हा मलाच निवडून द्या. आगामी काळातही भाजपचीच सत्ता राहणार आहे. माझ्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. तुमचे काय प्रश्न असतील ते मीच सोडविणार आहे. काम करताना विखे पाटील यांचा शब्द महत्त्वाचा असतो. ते कागदावर कधीही आश्वासन देत नाहीत. म्हणून तुम्हाला जे काही आश्वासन देतो, ते करून दाखवतो, असेही खासदार विखे म्हणाले आहेत.

 

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like