‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील ‘भाईटम साँग’ ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ’@2,53,12,445 Views

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लहानग्यांपासुन थोरा-मोठयांनी डोक्यावर घेतलेल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटातील ‘अराररारा खतरनाक’ या गाण्याचा ट्रेंड अद्यापही कायम आहे. यू-टयुबवर चालती असलेल्या ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ’ या गाण्याने नुकताच 2 कोटी 53 लाख 12 हजार 445 चा टप्पा पार केला. प्रविण विठ्ठल तरडे लिखित – दिग्दर्शित आणि अभिजित भोसले जेन्यूझन प्रॉडक्शन्स एलएलपी व पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा.लि. निर्मित मुळशी पॅटर्न या चित्रपटाला संपुर्ण महाराष्ट्रानेच डोक्यावर घेतले होते. चित्रपटाला आत्‍तापर्यंत विविध पुरस्कार देखील मिळालेले आहेत. मात्र, या गाण्याला छप्पर फाड व्हूज मिळाले आहेत.

छोटया पडद्यावर देखील टीआरपीचा उच्चांक गाठणार्‍या मुळशी पॅटर्न या चित्रपटाने आत्‍तापर्यंत अनेक विक्रम मोडले आहेत. अलिकडील काळामध्ये चित्रपट मराठी असो की हिंदी त्यामध्ये ‘आयटम’ साँग अथवा ‘भाईटम’ साँग असतेच. त्याच पार्श्‍वभुमीवर मुळशी पॅटर्न चित्रपटात एका मोठया भाईच्या वाढदिवसा दिवशीच्या जल्‍लोषावर हे गाणे आहे. या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि आता नुकतेच त्या गाण्याने एवढया व्हूजचा टप्पा पार केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like