मुंबईकर आता ‘रामभरोसे’ ; ‘या’ नेत्याने डागली तोफ

मुंबई : वृत्तसंस्था – अतिवृष्टीमुळे मुंबईत हाहाकार माजलेला असताना ,आता त्यावरून राजकीय आखाड्यात एकमेकांना ‘ पाण्या’त पाहण्याचे डावपेच रंगले आहेत. मुंबईत नालेसफाई व्यवस्थित न झाल्यानेच मुंबई बुडाली असा आरोप करताना काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांसमवेत काढलेल्या देवदर्शनालाही ‘लक्ष्य’ केले.

मुंबईत दिन दशके सत्ता असतानाही जनतेला मूलभूत सुविधा देण्यात शिवसेना अपयशी ठरली आहे, अशी टीका करून अशोक चव्हाण म्हणाले कि, नियोजनशून्य कारभार आणि अनिर्बंध भ्रष्टाचारामुळे मुंबई अधोगतीच्या गाळात बुडत आहे. महापालिकेत लुटमारीचा कारभार सुरु असताना ‘ पहारेकरी’ हा झोपेचे सोंग घेऊन निवांत बसला आहे. त्यामुळे मुंबईकर आता ‘ रामभरोसे ‘ झाले आहेत. खासदारांना घेऊन देवदर्शन करण्याऐवजी मुंबईत नालेसफाई केली असती तर मुंबई बुडाली नसती अशा शब्दात चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

प्रशासकीय अपयश व नालेसफाईतील भ्रष्टाचारामुळे दरवर्षीच मुंबई पाण्याखाली जाते. पण कधी समुद्राच्या भरती-ओहोटीवर खापर फोडून तर कधी जास्त पाऊस झाल्याचा बहाणा सांगून शिवसेना दरवेळी नामानिराळी होण्याचा प्रयत्न करते. संपूर्ण मुंबई शहरासह खुद्द शिवसेना पक्षप्रमुखांचे निवासस्थान असलेल्या कलानगरात प्रचंड पाणी तुंबते. तळमजल्यावर राहणारे लोक आपले किंमती सामान सुरक्षित ठिकाणी हलवतात. किमान ते बघून तरी ‘आम्ही मुंबई बुडवून दाखवली’ याची जाहीर कबुली देऊन शिवसेनेने जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like