मुंबईतील पावसाचं पाणी ओसरु लागलं, चाकरमानी घरी परतण्यास सुरुवात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुसळधार पावसामुळे सुमारे १० तास बंद पडलेली मुंबईतील रेल्वे सेवा पहाटेच्या सुमारास रुळावरील पाणी ओसरु लागल्यानंतर सुरु झाली आहे. त्यामुळे काल रात्रभर ठिकठिकाणी अडकून पडलेले चाकरमानी आज पहाटेपासून घरी परतण्यास सुरुवात झाली आहे. पहाटे ३ वाजून १७ मिनिटांनी मुंबईहून पहिली लोकल अंबरनाथकडे रवाना झाली. दररोज सकाळी मुंबईच्या दिशेने कामाला  जाणाऱ्यांची प्रत्येक रेल्वे स्थानकावर तोबा गर्दी असते, पण आज गुरुवारी ठाणे, डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकावर मुंबईच्या दिशेने जाणारे प्लॅटफॉर्म रिकामे दिसत होते तर, मुंबईहून घरी परतणाऱ्यांची गर्दी सर्वत्र दिसत होती.

तिन्ही मार्गावरील लोकल सेवा आता सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी रात्रभर थांबलेले लाखो मुंबईकर आता उपनगरातील आपल्या घरी परतू लागले आहेत. सिद्धीविनायक मंदिर विश्वस्तांनी अडकलेल्या मुंबईकरांची मंदिराच्या आवारात राहण्याची रात्रभर सोय केली होती. या प्रवाशांना त्यांनी पाणी, जेवण, बसण्यासाठी सतरंज्या पुरविल्या होत्या. त्यामुळे असंख्य लोकांची सोय झाली. त्याचप्रमाणे मुंबईतील रेल्वे स्थानकावर थांबलेल्या हजारो प्रवाशांना परिसरातील लोकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला.

रस्त्यात सोडलेल्या गाड्याने वाहतूकीचा खोळंबा –

बुधवारी मुंबईतील सर्वच रस्ते जलमय झाले होते. अनेक गाड्या रस्त्यात अडकून पडल्या होत्या. त्यामुळे मोटारचालकांनी त्या गाड्या तशाच रस्त्यात सोडून लोक निघून गेले होते. मात्र, आता रस्त्यावरील पाणी ओसरल्याने या सोडून दिलेल्या गाड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूकीचा खोळंबा होऊ लागला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –