‘या’ सरकारी कर्मचार्‍यांना कामावर एक तास उशिरा येण्याची सुट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनपा कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून एक सवलत देण्यात आली आहे. शहरात सुरु असलेल्या मेट्रो कामामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर येण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना कामावर एक तास उशीरा येण्याची सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जे कमर्चारी आधीच कामावर उशीरा येत आहेत, त्यातच सरकारने ही सवलत दिल्याने त्यांना कामावर उशीरा येण्याचे आणखी एक कारण मिळाले आहे.

सरकारने मार्चमध्ये पुणे महानगर पालिकेकडे मत मागितले होते

मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात मेट्रोचे काम सुरू आहे. वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयात वेळेत पोचण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे ही समस्या जाणून घेत भाजपाचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला एक निवेदन दिले होते. या निवेदनामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर उशीराने येण्याची परवानगी द्यावी असे म्हटले होते. खडसे यांच्या पत्रानुसार राज्य सरकाने मुंबईतील सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर उशीरा येण्यासंबंधीची कार्य़पद्धती अवलंबण्यास सुरुवात केली आहे. या धर्तीवर सरकारने मार्चमध्ये पुणे महापालिकेकडे मत विचारले होते.

पुणे महापालिकेत १८ हजार कर्मचारी काम करतात. पुण्यात मेट्रोचे काम सुरु असून वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास उशीर होतो. त्यामुळे पुणे मनपा कर्मचाऱ्यांना देखील मुंबई प्रमाणे कर्मचाऱ्यांना कामावर उशीरा येण्याची सवलत द्यावी असे पुणे मनपाने आपले मत मांडले. आता या कर्मचाऱ्यांना मुंबई प्रमाणे कामावर उशीरा येण्याची सवलत मिळणार का हे पहावे लागले.

राज्य शासनाने दिलेल्या सुविधेनुसार महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून मेट्रोच्या कामांची माहिती घेतली जाईल. त्यानंतर गरज पडल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल असे मनपा उपायुक्त अनिल मुळे यांनी सांगितले.

सूट मिळेल पण वेळेत काम पूर्ण करणे गरजेचे

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना कामावर एक तास उशीर येण्याची सवलत मिळेल. मात्र संबंधीत कर्मचाऱ्याला त्याचे काम वेळेत पूर्ण करावे लागेल. एक तास उशीरा आल्यानंतर एक तास जास्त थांबून काम पूर्ण करणे गरजेचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त –