मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचा गलथान ‘कारभार’ !

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन –  मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, सफाई कर्मचारी व इतर रिक्त असलेली पदे आणी अनेक सोई सुविधांचा अभाव असल्याने मुरबाड तालुक्यातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने आमदार किसन कथोरे यांनी रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देताच आरोग्य सेवा मंडळाच्या उपसंचालकानी आज ग्रामीण रुग्णालया मधील सोई सुविधांचा आढावा घेतला.

मुरबाड ग्रामीण रुग्णालयाच्या गलथान कारभारा विरुद्ध आमदार किसन कथोरे यांनी तात्काळ सोई सुविधा उपलब्ध न केल्यास रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देताच आज आरोग्य सेवा मंडळ ठाणे-मुंबईच्या उपसंचालक डॉ. गौरी राठोड, राज्याच्या आरोग्य सेवा संचालिका डॉ. साधना तायडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी आज मुरबाड ग्रामीण रुग्णालया मधील स्वछता, सोयीसुविधा, रिक्तपदे, औषध साठा यांची पाहणी केली.

ग्रामीण रुग्णालया तील सोई सुविधा पाहणी दौऱ्या वेळी स्थानिक भाजप कार्यकर्ते बाबू चौधरी, मुकेश विशे, मुरबाड नगर पंचायतीचे नगरसेवक संतोष कोळेकर यांनी रुग्णालयातील विविध समस्यांचा पाढा आरोग्य उपसंचालक यांच्या समोर मांडला. स्रियांच्या नॉर्मल बाळंतपणा साठीही खासगी रुग्णालयात रेफर केले जात असल्याने गोरगरिबांनाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने येथे तात्काळ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची आग्रही मागणी या वेळी करण्यात आली.

या पाहणी दौऱ्या नंतर झालेल्या बैठकीत भाजप कार्यकर्त्याच्या रोषाचा सामना जिल्हा शल्य चिकित्सक आणी आरोग्य सेवा संचालक यांना करावा लागला. या प्रसंगी भाजप कार्यकर्ते आणी पत्रकार यांनी रिक्त पदांचा त्वरित निर्णय घ्या असा पवित्रा घेतल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दोन डॉक्टर, इसीजी व्यवस्था, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय,सीसीटिव्ही यंत्रणा येत्या पंधरा दिवसांत उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Visit : Policenama.com