मुलाच्या खुनप्रकरनी एकाला जन्मठेप

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जत तालुक्यातील सिध्दनाथ एका मुलाच्या खुनप्रकरनी एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. विजय शिवाजी माने (वय 37, रा. जत) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. येथील उदयसिंह ऊर्फ सोनू बलराज रुपनर (वय 15) सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ऍड. अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. 25 मे 2015 रोजी ही घटना घडली होती. उदयसिंह ऊर्फ सोनू बलराज रुपनर (वय 15) याचा त्याने खून केला होता.

बलराज रुपनर जत तालुक्‍यातील पांढरेवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. बलराज त्यांची पत्नी छायादेवी, मुले उदयसिंह, सोमेश्वर, मुलगी ऋतुजा 25 मे 2015 रोजी सांगलीत अधिवेशनासाठी गेले होते. सांगलीहून जतमध्ये यायला त्यांना रात्रीचे 12 वाजले होते. दरम्यान, सिध्दनाथला जाण्यास बस नसल्याने छायादेवींनी विजय माने याची गाडी भाड्याने ठरवली. बलराज दुचाकी घेऊन पुढे गेले. चारचाकी गाडीतून छायादेवी, ऋतुजा, उदयसिंह, सोमेश्वर निघाले. मात्र, विजयची ऋतूजावर वाईट नजर होती. छायादेवी यांच्या अंगावरील सोने व पैसे लुबाडण्याच्या हेतूने त्याने सिध्दनाथ फाट्यावर गाडी बंद पाडली.

दुसरी गाडी बघून देतो म्हणून तो उदयसिंहला सोबत घेऊन गेला. काही अंतरावर गेल्यावर उदयसिंहचा ओरडण्याचा आवाज आला. आई छायादेवी व ऋतुजा, सोमेश्वर हे सर्व धावून गेले. विजयने उदयसिंह याला चाकूने वार करून जखमी केले होते. यावेळी धावून आलेल्या आईसह तिघांवरही वार करून त्याने पळ काढला. नंतर उदयसिंहला उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. घटनेनंतर तातडीने जत पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी तातडीने विजयला अटक केली. त्याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारपक्षातर्फे एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी ऋतुजा रूपनर, जखमी सोमशेखर रूपनर, डॉ. नितीन निनाल, डॉ. विजय हांडे, मुख्याध्यापक रामचंद्र राठोड, तपास अधिकारी श्रीकांत पिंगळे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. त्यानुसार आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय