तस्करीसाठी पुण्यात ओला चालकाचा खून ; आरोपीला राजस्थानमधून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कात्रज-कोंढवा रोडवरील आईएमडी स्कूल समोरीली मैदानात एका ओला कॅबचालकाचा खून करण्यात आला होता. अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी ओला चालकाचा खून केल्याचे तपासात उघड झाले असून आरोपीला राजस्थान येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात चोरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती.

सुनिल रघुनाथ शास्त्री (वय-५२ रा. लोहगाव) असे खून करण्यात आलेल्या ओला कॅबचालकाचे नाव आहे. तर तपेशकुमार पुखराम चौधरी (वय-३२ रा. जोधपुर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मयताचा मुलगा मनिष सुनिल शास्त्री (वय-२२ रा. लोहगाव) याने विमानतळ पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. आरोपीने चोरून नेलेल्या ओला कारचा माग कढल्यावर कार गुजरात येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गुजरात पोलिसांच्य मतदतीने आरोपीला गुजरात-राजस्थान सीमेवर अटक करण्यात आली. आरोपीकडे चौकशी केली असता त्याने अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी सुनिल यांचा खून केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईएमडी स्कूलसमोरील मैदानात सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यावेळी मृत व्यक्ती ही सुनिल शास्त्री असून त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार विमानतळ पोलीस ठाण्यात करण्यात आले असल्याची माहित कोंढवा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी फिर्य़ादीकडे चौकशी केली असता सुनिल शास्त्री हे ओला कॅब चालक असून शुक्रवारी रात्रीपासून त्यांचा फोन बंद लागत असल्याची माहिती फिर्य़ादी मनिष शास्री याने दिली.

पोलिसांनी ओला कंपनीची मदत घेऊन गाडी लोकेशन तपासले. त्यावेळी ती गुजरात राज्यातील वापी येथे असल्याची माहिती मिळाली. गुजरात पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. दरम्यान गाडीचा प्रवास राजस्थानच्या दिशेने सुरु होता. गुजरात पोलिसांनी आरोपीला गुजरात राजस्थान बॉर्डवर पकडण्यात आले. दरम्यान, आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले होते. आरोपीला पुण्यात आणून चौकशी केली असता त्याने अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी शास्त्री यांचा खून करून कार चोरून नेल्याचे सांगितले.

ही कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, हडपसर विभागाचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त प्रकाश गायकवाड, सुनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पंकज पवार, पोलीस उप निरीक्षक संतोष शिंदे, सागर काळे, विष्णु वाडकर, भिमराव मांजरे, तपास पथकातील कर्मचारी पोलीस हवालदार राजस शेख, अमित साळुंके, अजिम शेख, इकबाल शेख, पृथ्वीराज पांडुळे, योगेश कुंभार, सुरेंद्र कोळगे, किरण मोरे, निलेश वणवे, विलास तोगे, रविंद्र भोसले, आदर्श चव्हाण, उमाकांत स्वामी, जगदीश पाटील, उमेश शेलार, मोहन मिसाळ, संजय चव्हाण, रिकी भिसे यांच्या पथकाने केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like