अहमदनगर : ‘या’ बाजार समितीच्या ९ संचालकांचे राजीनामे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पारनेर बाजार समितीच्या १० संचालकापैकी ९ संचालकांनी सभापती प्रशांत गायकवाड यांच्या मनमानीला कंटाळून राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे  संचालकांनी आज जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्याकडे सुपुर्द केले. ते राजीनामे जिल्हा उपनिबंधकाकडे की राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांकडे यांच्याकडे द्यायचा, याबाबत उद्या निर्णय घेतला जाणार आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या सभेच्या तोंडावर राष्ट्रवादीत फूट पडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पारनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. निलेश लंके यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून हा वाद आणखी चिघळला आहे. नुकत्याच झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीवेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या बाहेरून आलेल्यांचा विचार केल्यास वेगळा विचार करण्याचा गर्भित इशारा दिला होता. त्यातच आज सायंकाळी बाजार समितीच्या दहापैकी नऊ संचालकांनी राजीनामेचे हत्यार उपसल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या राज्यावर नेमका काय निर्णय घ्यायचा, याबाबत उद्या अंतिम निर्णय केला जाणार आहे.

दरम्यान आज सायंकाळी सुजित झावरे यांच्या संपर्क कार्यालय उपसभापती संचालकांची बैठक झाली. या बैठकीला संचालकांनी सभापती गायकवाड यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –