अहमदनगर : ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी रास्ता रोको

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा क्रीडा विभागातील मनमानी कारभाराविरोधात सर्व क्रीडा शिक्षक संघटना, क्रीडा संघटना, खेळाडू आदी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या बदलीसाठी दिनांक १७ ऑगस्ट रोजी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षण शिक्षक, विविध खेळ संघटना समन्वय समितीने माहिती दिली. यावेळी समितीचे सुनील जाधव, प्रा. विजय म्हस्के, प्रा. संजय साठे, राजेंद्र कोतकर, आप्पासाहेब शिंदे, घनश्याम सानप, दिलीप घोडके समितीचे सदस्य उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा समितीला विचारात न घेताच ‘हिटलरशाही’सारखे कायदे खेळाडू क्रीडा संघटना क्रीडाशिक्षक सर्वसामान्य नागरिकांना लावून मनमानी कारभार क्रीडा अधिकारी करीत आहेत. तेथे कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जात नसून, जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना चुकीची माहिती दिली जाते. मंत्र्यांच्या नावे धमक्या देऊन व शासकीय यंत्रणेला चुकीची माहिती देऊन खोट्या पुण्यामध्ये अडकून कार्यवाही करण्याची धमकी नावंदे या देतात. सध्या जिल्हा क्रीडा संकुल बाजूला जाऊन तेथे  व्यापारी संकुल झाले आहे. तसेच स्विमिंग पूल हा पूर्णपणे व्यवसायिक केले असल्याचा आरोप समिती सदस्यांनी यावेळी केला.

प्रवेश शुल्क पावतीबाबत सर्वांना संशय आहे. दोन वेगळ्या प्रकारच्या पावती असून त्यावर कोणत्याही प्रकारचे नंबर नाहीत अथवा क्रीडा कार्यालयाचा शिक्का व सही नाही, हेही समिती सदस्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त