महापालिकेतील अभियंते ‘भ्रष्टाचारी’ ; शिवसेना उपनेते राठोड यांचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेत राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने अभियंत्यामार्फत खोटे आरोप करुन शिवसेनेला बदनाम करण्याचे काम चालू आहे. मनपातील खरे भ्रष्टाचारी हे अभियंतेच आहेत, असा खळबळजनक आरोप शिवसेना उपनेते व माजी आमदार अनिल राठोड यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

राठोड म्हणाले की, महापालिकेतील अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी करण्याच्या मागणीसाठी लोकायुक्तांकडे जाणार आहे. अभियंत्यांचे दहशतीचे विधान म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. महापालिकेतील अधिकाऱ्यांची काही महत्वाचे कागदपत्रे गोळा करीत आहे. ती मिळाल्यानंतर अधिकार्‌यांच्या संपत्तीचे खातेनिहाय चौकशी व्हावी, अशी मागणी लोकायुक्तांकडे करणार आहे.

‘त्या’ प्रकरणात अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासा : शहरप्रमुख सातपुते
मनपा अधिकाऱ्यावर बूट फेक प्रकरणात अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासावे, अशी मागणी न्यायालयात करणार असल्याचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी सांगितले. अधिकाऱ्यांची माहिती मागविली असल्याने त्यांना घोटाळा बाहेर येण्याची चिंता वाटू लागली आहे. तसेच घोटाळा बाहेर आल्यास मनपातील चार अधिकारी जेलमध्ये जातील, असेही त्यांनी सांगितले.

अनेक कामांची बोगस बिले काढली : फुलसौंदर
अनेक ठेकेदारांचे बोगस कामे असून बोगस बिले काढली जात आहेत. याची माहिती मागितली असून कामांची फेरतपासणी झाल्यास अनेकांचे पितड उघडे पडणार असल्याचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी सांगितले. भ्रष्टाचारामुळे मनपाच्या अनेकांना जेल वारी करावी लागती आहे. आता अधिकारीच सेनेच्या नावाने बोंबा मारत आहेत. अभियंत्यांचे म्हणणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत, असे उपनेते राठोड यांच्यासह फुलसौंदर म्हणाले.

बल्लाळची बदली कोणी केली : बोराटे
अभियंता कल्याण बल्लाळची बदली कोणी केली. कशी केली हे सर्वांना माहित आहे. अधिकाऱ्यांकडे पैसा येतो कुठून, असा सवाल करत अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा लोकायुक्तांकडे देणार असल्याचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले. यावेळी माजी शहर प्रमुख संभाजी कदम हेही उपस्थित होते.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही