उद्योजक हुंडेकरी यांचे अपहरण करणारे दोघे अटकेत, 25 लाखांची खंडणीची केली होती मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  – शहरातील प्रतिष्ठित उद्याेजक वसीम हुंडेकरी यांचे अपहरण केल्याप्रकरणी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अजहर मंजूर शेख यांनी 25 लाखांच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्यासह एक साथीदार फरार आहे. दोघांनाही जालना जिल्ह्यातील परतूर येथून अटक करण्यात आली.

वैभव विष्णू सातोनकर (वय १९, रा. सातोनकर गल्ली, परतूर, ता. परतूर, जि. जालना), निहाल उर्फ बाबा मुशरफ शेख (वय २०, रा. लढ्ढा कॉलनी, ता परतूर, जि. जालना) ही अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, दि.१८/११/२०१९ रोजी पहाटे ०५/४० वा. सुमारास नगर शहरातील उदयोजक अब्दुल करीम सय्यद (वय ७०, रा. घर नं. ६९६१ एस टी कॉलनी समोर, फकीर गल्ली.अ.नगर) यांचे अज्ञात दोन इसमांनी पकडून बळजबरीने कारमध्ये बसवून साथीदारांचे मदतीने अपहरण केलेले होते. त्यासंदर्भात सय्यद अफरोज अब्दुल करीम (वय ४३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पो.स्टे. येथे गु.र.नं. १५७५/२०१९ भादंवी कलम ३६३,३६४ अ, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात बाबत सूचना दिल्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या एकूण ३ टीम सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत होत्या.

सदर गुन्हयाचे समांतर तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, सदर चा गुन्हा हा अहमदनगर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार अजहर मंजुर शेख याने त्याचे परतुर, जि. जालना येथील साथीदारांसह केला असल्याची बातमी मिळाली. बातमीचे खात्री करणे कामी परतूर जि. जालना या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. संदिप पाटील, पोहेकॉ/मन्सुर सय्यद, दत्ता हिंगडे, दत्ता गव्हाणे, पोना/मल्लीकार्जुन बनकर, दिगंबर कारखिले, रविंद्र कर्डीले, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/संदिप दरंदले, मेघराज कोल्हे, मंच्छिद्र बर्डे, सचिन आडबल, संदिप घोडके, चापोकॉ/सचिन कोळेकर असे बातमीतील नमुद ठिकाणी गेले असता लढ्ढा कॉलनी या ठिकाणी पहाटेच्या सुमारास सापळा रचला.

मुख्य आरोपी अजहर मंजूर शेख हा राहत असलेल्या घरावर छापा टाकला. वैभव विष्णू सातोनकर (वय १९, रा. सातोनकर गल्ली, परतूर, ता. परतुर जि. जालना), निहाल उर्फ बाबा मुशरफ शेख (वय २०, रा. लढ्ढा कॉलनी, ता. परतूर जि. जालना) यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन नमुद गुन्हया बाबत विचारपुस करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यांना विश्वासात घेवुन अधिक चौकशी करता त्यांनी वरील गुन्हया बाबत कबुली देवुन सदरचा गुन्हा हा त्यांचे इतर दोन साथीदार अजहर मंजुर शेख (रा. फकीर गल्ली), फतेह सिध्दीक अहमद अन्सारी (रा. मलंगशहा मोहल्ला, परतुर जि. जालना) यांचे मदतीने व शेख यांच्या सांगणेवरुन केला असल्याची कबुली दिली. दोघे रेल्वे स्टेशन येथे चहा पिण्यासाठी गेले होते. पोलीस आल्याची चाहूल लागल्याने दोघे अपहरण करण्यासाठी वापरलेले वाहन टाटा टियागो (नं. एम एच २० ई जे ३८७९) सोडून चावी घेवून फरार झाले आहेत. सदर ठिकाणी जावून गुन्हयातील वाहन हे ताब्यात घेवून परतूर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे.

Visit :  Policenama.com