वकिलाने पकडली वायरमनची गचांडी ; सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – रोहित्र दुरूस्त करणाऱ्या वायरमनची गचांडी पकडून वकिलाने सरकारी कामात अडथळा आणला. नेवासा येथील रघुनाथ गॅस एजन्सी येथे ही घटना घडली.

गोरक्षनाथ काकडे (रा. नेवासा, जि. नगर) हे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, महावितरणचे वायरमन रवी मच्छिंद्र कांबळे हे काल दुपारी नेवासा येथील रघुनाथ गॅस एजन्सी जवळ असलेले नादुरुस्त रोहित्र दुरूस्त करीत होते. त्यावेळी तेथे वकील काकडे आले. त्यांनी कांबळे यांना शिवीगाळ करून कॉलर पकडून ढकलून दिले. तसेच इतरांना शिवीगाळ केली.

याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्याचे रवी कांबळे यांच्या फिर्यादीवरून वकील गोरक्षनाथ काकडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार टी. बी. गिते हे करीत आहेत.