कारखाने चालण्यासाठी दुष्काळी जनतेला उपाशी ठेवणार का ? ..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पाणी शिल्लक नाही म्हणता. पुढाऱ्यांचे कारखाने चालण्यासाठी तुम्ही दुष्काळी भागातील गोरगरीब जनतेला उपाशी मारणार काय, असा सवाल अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आज उपस्थित केला आहे. तसेच दुष्काळी जनता उपाशी मरताना मला बघवत नाही. त्यामुळे त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी तुम्ही मला मरताना पहा, असा इशाराही त्यांनी दिला.
‘साकळाई’ उपसा जलसिंचन योजनेसाठी पाणी शिल्लक नाही, अशा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याचा चांगलाच सय्यद यांनी चांगलाच समाचार घेतला. साकळाई पाणी उपसा सिंचन योजनेसाठी क्रांती दिनापासून सय्यद या उपोषणाला बसणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज खडकी, सारोळा कासार, वडगाव तांदळी, गुणवडी, रुई छत्तीसी या गावात त्यांनी दौरा केला. सारोळा कासार येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच भानुदास धामणे होते.
नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांसाठी ठरणा-या ‘साकळाई’ उपसा जलसिंचन योजनेसाठी सामाजिक कार्यकर्त्या आणि संवेदनशिल अभिनेत्री दिपाली सय्यद – भोसले यांनी जनआंदोलनाचे हत्यार
उपसले आहे. क्रांतीदिनी (दि.९ ऑगस्ट) जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु करण्याचे जाहीर केले आहे. या उपोषणाला मोठ्या जनआंदोलनाचे स्वरूप येवून राज्य सरकारवर दबाव येण्यासाठी त्यांनी शनिवारपासून गावोगावी जनजागृती दौरा सुरु सुरु केला आहे.
रविवारी साराेळा कासार येथे झालेल्या सभेत शिक्षकनेते संजय धामणे, शिवसंग्राम पक्षाचे प्रदेश
सरचिटणीस कृषिराज टकले, ‘साकळाई’ उपसा जल सिंचन योजना कृती समितीचे अध्यक्ष ह. भ. प. बाबा महाराज झेंडे आदी उपस्थित होते.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like