काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांना मोठा धक्का ! जिल्हा बँकेचा अध्यक्ष पहिल्यांदाच भाजपाचा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर यांनी आज राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड व आमदार पिचड यांच्या समवेत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष भाजपात गेल्याने नगरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद भाजपच्या पारड्यात पडले आहे. ही बाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का मानला जात आहे.

मधुकरराव पिचड यांच्यासह आ. वैभव पिचड यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळीच गायकर यांचाही प्रवेश करून घेण्यात आला. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकर यांचे स्वागत केले. बँकेवर काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात व मंत्री राधाकृष्ण विखे यांची सत्ता आहे. गायकर हे पूर्वी थोरात गटाचे समजले जात होते. आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने हा थोरात गटाला मोठा धक्का म्हणावा लागेल.

जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष गायकर हे भारतीय जनता पक्ष दाखल झाल्याने जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाकडे आलेले आहे. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील नेत्यांची सहकार क्षेत्रावर पकड असल्याने या पक्षाकडेच जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद राहिले. आता जिल्हा बँकेचे अध्यक्ष भाजपा दाखल झाल्याने तांत्रिक दृष्ट्या भाजपाकडे हे पद आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –