चॉकलेट-बिस्कीट गोदामाला भीषण आग !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – चास येथील एस.के. एन्टरप्रायजेसच्या चॉकलेट व बिस्किटांच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत सुमारे 50 लाख रुपयांचा माल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असे सांगितले जात आहे. तब्बत ९ तास आग धुमसत होती.

याबाबत माहिती अशी की, केडगाव ते सारोळा कासार रोडवर सोनेवाडी गावाजवळ संदीप फाटक यांच्या मालकीचे एस.के. एन्टरप्रायजेसचे पारले कंपनीचा माल साठविण्याचे गोदाम आहे. फाटक यांच्याकडे पारले कंपनीच्या चॉकलेट व बिस्किटांसह विविध खाद्य पदार्थ्यांच्या उत्पादनाची एजन्सी आहे. या गोडावूनमधून नगर शहर व तालुक्यात हा माल वितरीत केला जातो. त्यामुळे या गोडावूनमध्ये त्यांनी सुमारे ५० ते ६० लाखांचा माल साठवून ठेवलेला होता. बुधवारी (दि.१९) सायंकाळी फाटक व त्यांचे कर्मचारी गोडावून बंद करून घरी गेले होते. गुरुवारी पहाटे २ ते २.३० च्या सुमारास गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. गोडावून मधून धूर बाहेर येवू लागल्याने गोडावून शेजारी राहणा-या नागरिकांनी फाटक यांना फोन करून माहिती दिली. फाटक हे केडगाव येथे राहत असल्याने त्यांनी गोडाऊनला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. या आगीत गोडावूनमधील संपूर्ण माल जळून खाक झाल्याचे दिसून आले.

सदर गोडावून हे गावापासून थोडे अंतरावर असून त्या ठिकाणी आग विझविण्यासाठी उपाययोजना नसल्याने नगर महापालिकेच्या अग्निशामक दलाला बोलावण्यात आले.

अग्निशामक दलाने घटनास्थळी जावून आगीवर पाण्याचा मारा केला. गोडावून मध्ये मोठ्या प्रमाणावर माल असल्याने आणि सर्व मालाला प्लास्टिकचे आवरण असल्याने आग सुमारे ९ तास धुमसत होती.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा