अहमदनगरताज्या बातम्या

शहरातून निघालेल्या किर्तन मिरवणुकीनं वेधलं नगरकरांचं लक्ष, पारंपारिक शस्त्रांचे धाडसी प्रात्यक्षिके सादर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गुरूनानक देवजी यांच्या 550 व्या जयंती वर्षानिमित्त गुरुद्वारा भाई दयासिंग तसेच शीख, पंजाबी व सिंधी समाज बांधवांच्या वतीने रविवार दि.3 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शहरातून किर्तन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. जो बोले सो निहाल सत श्री अकालच्या घोषणा व गुरुनानक देवजींच्या जयजयकाराने शहर दुमदुमले. मिरवणुकीत समाजबांधवांसह महिला, युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करुन मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

गोविंदपुरा येथील भाई दयासिंग गोविंदपुरा येथून या किर्तन मिरवणुकीचे पारंपारिक वाद्यांच्या गजरात प्रारंभ झाले. तारकपुर येथे या मिरवणुकीचे समाजबांधवांसह आमदार संग्राम जगातप व नगरसेवक योगीराज गाडे यांनी स्वागत करुन दर्शन घेतले. या मिरवणुकीत गुरुद्वार्‍याचे अध्यक्ष गुरुद्यालसिंग वाही, हरजितसिंह वधवा, गुरभजनसिंग नारंग, रविंद्र नारंग, लकी वाही, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, प्रदिप पंजाबी, अमरजितसिंग वधवा, प्रिटी ओबेरॉय, गोविंद खुराणा, अजय पंजाबी, राकेश गुप्ता, राजेंद्र चावला, गुरुविंदरसिंग भाटिया, अनिश आहुजा, परमजितसिंह अरोरा, जनक आहुजा, प्रित नारंग, विकी मल्होत्रा, निपू धुप्पड, संजय आहुजा, सतिंदर नारंग, बबलू खोसला, जगदीश मटलाई, बिट्टू मनोचा, जगदीश बजाज, मनिष नारंग, बाबू डेमला, सिमर वधवा आदी समाजबांधव सहभागी झाले होते.

मिरवणुकीत पंचप्यारे व निशाण अग्रभागी होते. पंजाबी युवकांनी लाठी-काठी, तलवारबाजी, दाणपट्टा आदी पारंपारिक शस्त्रांचे धाडसी प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांच्या ह्रद्याचा ठोका चुकविला. मिरवणुकीत महिलांनी सादर केलेल्या किर्तनाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. रथात असलेल्या गुरुग्रंथ साहिबचे दर्शनास भाविकांनी गर्दी केली होती. लालटाकी येथून पायी निघालेल्या किर्तन मिरवणुक सर्जेपुरा, तेलिखुंट, नवीपेठ, माणिक चौक, कापड बाजार, आडते बाजार, रामचंद्र खुंट, कोठला, एसटी डेपो गुरुद्वारा, डीएसपी चौक येथून मार्गक्रमण करीत पुन्हा गोविंदपुरा येथील भाई दयासिंग गुरुद्वारा येथे या मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळी गुरुद्वार्‍यात किर्तनसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भंडार्‍याने (लंगर) कार्यक्रमाची सांगता झाली.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या

Back to top button