‘त्या’ दबंग अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्तव्यदक्ष जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्हा क्रीडा संकुलात विविध सुधारणा केल्या आहेत. त्यांनी चांगले काम करून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नावंदे यांची बदली करू नये, असे निवेदन शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना दिले आहे.

यावेळी इतिहीसप्रेमी मंडळाचे इंजी.अभिजीत एकनाथ वाघ, भैरवनाथ वाकळे, असिफखान दुलेखान, तुषार सोनवणे, दिपकराव शिरसाठ, रामदास वागस्कर, अरूण थिटे आदी उपस्थित होते. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे यांनी मार्च २०१९ मध्ये पदभार स्विकारल्यापासून जिल्हा क्रिडा संकुल येथे विविध सुधारणा केल्या आहेत. शालेय क्रिडा स्पर्धेची नोंदणी आणि शुल्क ऑनलाईन पध्दतीने करुन क्रिडा क्षेत्रात पारदर्शकता आणली आहे. जलतरण तलावाची व्यापक निविदा मागविल्याने राज्य शासनास क्रिडा संकुल विकासासाठी २७ लाखांचा महसूल मिळाला आहे. त्यांनी केलेल्या सुधारणांमुळे काहींचे आर्थिक हितसंबंध धोक्यात आलेले आहेत. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या बदलीसाठी ते प्रयत्नशील असून खेळाडू विद्यार्थी आणि पालकांची अडवणूक करीत आहेत. स्पर्धांमधे दबाव टाकून अडथळे आणत आहेत.

शहरातील सजग नागरिक कर्तव्यदक्ष आणि चांगले काम करणा-या अधिका-यांच्या पाठीशी आहोत. चांगले अधिकारी शहरास लाभले तर शहराचा विकास नक्की होतो. क्रीडा क्षेत्रातील अपप्रवृत्ती थांबविण्यासाठी कविता नावंदे यांच्यासारख्या अधिका-याची अहमदनगर जिल्ह्याला गरज आहे. त्यामुळे आम्ही आपणास विनंती करत आहोत की त्यांची बदली करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like