अहमदनगर : बाजार समितीतील बेकायदा बांधकामाविरोधात शेतकरी, व्यापाऱ्यांचे धरणे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जामखेड बाजार समितीच्या आवारात अवैध रितीने सुरू असलेल्या भुखंडाचे बांधकाम बंद करून ते पाडावे, जनावरांचा व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांना तातडीने लायसन्स द्यावेत व जनावरांच्या आठवडी बाजारात सुरू आसलेले अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावेत, यासाठी आज भरवण्यात येणारा जनावरांचा आठवडी बाजार संतप्त जनावरांच्या व्यापार्‍यांनी व शेतकर्‍यांनी बंद करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धरणे आंदोलन केले. अखेर सभापती यांच्या लेखी अश्वासनानंतर तब्बल पाच तास सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज दरवेळीप्रमाणे बैलांचा आठवडे बाजार भरत असतो. मात्र आज सकाळीच संतप्त बैलांचे व्यापारी व शेतकर्‍यांनी या बाजारातील अवैध्यरित्या सुरू असलेले बांधकाम तातडीने बंद करुन ते पाडण्यात यावे, या मागणीसाठी बैलांचा भरणार आसलेला आठवडे बाजार बंद केला. सकाळी वाहनामध्ये घेऊन येणारे जनावरे व्यापार्‍यांनी रस्त्यात अडवून माघारी पाठवण्यात आले. त्यामुळे संपुर्ण बैलाच्या बाजारात शुकशुकाट जाणवत होता. यानंतर संतप्त व्यापारी व शेतकर्‍यांनी आपला मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर आणला व याठिकाणी धरणे आंदोलन केले. बैलाच्या व्यापार्‍यांना लायसन्स परवान्साठी एक महीन्यांनपुर्वी अर्ज दिलेले आसतानाही त्यांना जनावरे विक्री चे लायसन्स मिळाले नाही ते तातडीने देण्यात यावे, तसेच बैल बाजारात शौचालय, पाणी व निवाऱ्याची सोय करावी अशा मागण्या या आंदोलना दरम्यान करण्यात आल्या.

यानंतर सभापती गौतम उतेकर यांनी मोर्चेकऱ्यांच्या भावना जाणुन घेत भुखंडाचे सुरू असलेले बांधकाम तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येत आहे. तसेच बैलांचा व शेळी बाजार कुठेही दुसरीकडे हलविण्यात येणार नाही. जनावरांचा व्यापार करणारे व्यापारी यांना लायसन्स देण्यात येईल. बाजार समितीच्या आवारातील वृक्षतोड तोड होणार नाही. लवकरच शौचालयाची सोय उपलब्ध करून दिली जाईल व तातडीने संचालक मंडळांची मिटींग घेऊन पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर पाच तास सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like