शरण मार्केट जमीनदोस्त : मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लोक आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज सकाळी तोफखाना भागातील शरण मार्केट जमीन दोस्त केले. येथील तब्बल ६६ गाळे पाडण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक व्यावसायिक उघड्यावर आले आहेत.

महानगरपालिकेने कारवाई करत या ठिकाणी असलेले दुकाने जमीनदोस्त केली आहेत. कोणताही गाजावाजा न करता आज सकाळी सातच्या सुमारास महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग जेसीबीसह शरद मार्केट येथे दाखल झाला. लोकायुक्तांनी ही मार्केट पाडण्याचे आदेश दिले होते परंतु त्यास विलंब केला जात होता. त्यामुळे आयुक्तांनी याबाबत नगर विकास सचिवांना अहवाल मागवला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाला सदर गाळे पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार अतिक्रमण विभागाने आज सकाळीच ही कारवाई केली.

तत्कालीन जिल्हाधिकारी विमलेन्द्र शरण यांनी कापड बाजारातील फेरीवाल्यांसाठी उखाणा परिसरात छोटे छोटे गाळे तयार केले होते. ते कापड बाजार येथे रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांना देण्यात आले होते. त्यामुळे या परिसराला शरण मार्केट असे नाव देण्यात आले. ही जागा अहमदनगर महानगरपालिकेची होती. मात्र या ठिकाणी ज्या गाळेधारकांना गाळे देण्यात आले होते. त्यांनी न वापरता दुसरेच व्यापारी या ठिकाणी गाळे वापरत होते. अनेक दिवसांपासून शरण मार्केटचा प्रश्न नेहमीच वादात राहिला होता. अखेर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज सकाळी हे गाळे जमीनदोस्त केले आहेत.

Loading...
You might also like