home page top 1

..तर सत्तेची आसने खाक होतील ! शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला शिवसेना प्राधान्य आहे. शेतकऱ्यांच्या मनातील चीड उफाळून आल्यास सत्तेची आसने खाक होतील. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असा सूचक इशारा शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

पीक विमा केंद्राच्या उदघाटनासाठी ठाकरे हे आज श्रीरामपूरला आले होते. त्यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री कोणाचा होणार, हा प्रश्न माझ्यासाठी गौण आहे. कर्जमाफी व पीक विम्याचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला. यावर ठाकरे यांनी उपस्थितांना हात उंचविण्याचे आवाहन केले. मात्र बोटावर मोजण्याइतकेच हात वर आले. त्यावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची शिवसेनेची भूमिका आहे. प्रत्येक ठिकाणी पीक विमा केंद्र सुरू करा. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन त्याबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी.

शिवसेनेची शेतक-यांच्या प्रश्नावर नेहमीच लढण्याची भूमिका राहिली. पुणतांबे येथील शेतक-यांनी संपावेळी भेट घेतली असता मी विनाअट पाठिंबा दिला. इतर पक्षातील नेते आंदोलनापासून सावध भूमिका बाळगून होते. अन्नदाता सुखी राहिला पाहिजे. त्याचा बळी देण्याचे पाप आपण कदापी करणार नाही. शिवसेनेची ताकद ही तुम्ही आहात. तुमच्या हक्काच्या आड कोण येतो ते पाहतो, असा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे.

ज्यांनी सत्ता दिली त्यांचे अश्रू पुसायला जा
पक्षाचे खासदार, आमदार यांनी जनतेच्या दारापर्यंत जायला पाहिजे. ज्यांनी सत्ता दिली त्यांचे अश्रू पुसायला जा. सरकारच्या योजना गरिबांपर्यंत जातात की नाही हे लोकप्रतिधिंनी पहायला हवे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

संपूर्ण कर्जमाफी आमची प्राथमिकता
मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेने सत्तेत राहूनही कधीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड केली नाही. पूर्ण कर्जमाफी याला आमची प्राथमिकता होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्याकरिता संपूर्ण राज्याचा झंझावती दौरा केला. यापुढेही आपला संघर्ष सुरूच राहील.

यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आ. सुनील शिंदे, मिलिंद नार्वेकर, संजय घाडी, संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे, भाऊ कोरेगावकर, माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य विषयक वृत्त –
स्लीम व्हायचंय का ? या उपायांनी सहज कमी होईल पोट
सर्वच व्यायाम महिलांसाठी नसतात, जाणून घ्या कोणते व्यायाम करावेत
‘हे’ उपाय केले तर चष्मा लागणार नाही, नंबर वाढणार नाही
सावधान ! मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकतो ‘ब्रेन कँन्सर’
लो-इम्पॅक्ट एक्झरसाइज करा…आणि कॅलरीज होतील बर्न

Loading...
You might also like