राष्ट्रवादीचे आ. जगताप भाजपच्या ‘या’ नेत्याच्या भेटीला !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या शिवसेना प्रवेशाचे चर्चा चालू असतानाच आज रात्री ते माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून पक्षातील कार्यक्रमाला दांडी मारत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकांना जात नाहीत. ते बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असून, त्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेशासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नगरमधील सर्व शिवसैनिकांचा विरोध असल्याने नेमके काय होते, याच्या प्रतीक्षेत जगताप आहेत. त्यातच आज नगर मुक्कामी असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या भेटीसाठी आ. संग्राम जगताप हे माजी खासदार यांच्या निवासस्थानी आज रात्री दहा वाजता दाखल झाले. त्यांच्यामध्ये बंद खोलीत चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी धाव घेतली आहे. यावेळी उपमहापौर मालन ढोणे याही उपस्थित होत्या.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

Loading...
You might also like