खा. सुजय विखे यांचे महापालिकेत नव्या राजकीय घडामोडींचे संकेत : राष्ट्रवादीला सोडून ‘या’ पक्षा सोबत सत्ता स्थापन करणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन- अहमदनगर महानगरपालिकेतील राष्ट्रवादी-भाजप अशी आघाडी मोडीत काढून शिवसेनेसोबत भाजपची सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा नूतन खासदार सुजय विखे यांनी केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला धक्का बसणार आहे.

अहमदनगर महापालिकेत सध्या महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता आहे. अभद्र आघाडीला फाटा देत पुन्हा शिवसेना-भाजप युतीची सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती खासदार विखे-पाटील यांनी दिली आहे.

अहमदनगर महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला होता. पण, लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीने ताकद लावली होती. लोकसभा निवडणुकीत माझ्या पराभवासाठी राष्ट्रवादीने जोरदार प्रयत्न केले होते, असे खासदार विखे-पाटील यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता महापालिकेतील भाजप-राष्ट्रवादी ही विचित्र आघाडी आता संपुष्टात येणार आहे. भाजप-शिवसेना अशी आघाडी झाल्यास राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना मोठा धक्का बसणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
कार्डिअ‍ॅक रजिस्ट्रीसाठी ‘अपोलो’ आणि ‘अबोट’चा पुढाकार
हृदय प्रत्यारोपणाचे २५ लाख भरायचे कसे ? ‘तो’ शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत
सावधान ! चायनीज फूड खाताय ? हे लक्षात असू द्या