अपक्ष लढवून लायकी दाखवा ‘भाजप’ नगरसेवकांचे ‘शिवसेना’ नगरसेवकास जोरदार प्रतिउत्तर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन-  तुमची नगरपालिका असताना जकात चोर नगरसेवक म्‍हणून प्रसिध्‍द होता. तुम्‍हाला मिळालेली मते ज्‍या चिन्‍हांवर निवडणूक लढवली, त्‍या पक्षामुळे व नेत्‍यामुळे मिळाली आहेत. त्यामुळे अपक्ष लढवून आपली लायकी दाखवावी, असे प्रत्त्युत्तर भाजप नगरसेवक रवींद्र बारस्कर व सतीश शिंदे यांनी शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केलेल्या आरोपांवर दिले आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले की, तुम्ही अधिकारी वर्गांना ब्‍लॅकमेल कसे करता, हे सर्व नगरची जनता जाणते. शिवसेनेचा एबी फॉर्म खिश्‍यात घेवून तुम्‍ही राष्‍ट्रवादीचा एबी फॉर्म भरून शिवसेना पक्ष व स्‍वत:च्‍या वॉर्डातील नागरिकांना फसविता. पुन्‍हा एक दीड वर्षात शिवसेनेला पैसे घेवून पाठींबा देता. पुन्‍हा एक वर्षानंतर पैशाचा बाजार मांडून महापौर निवडणूकीतून स्‍वत:ची तुंबडी भरून घेता. स्‍वत:च्या पक्षातील नगरसेवकसुध्‍दा तुमच्‍या सारख्‍या विश्‍वासघातकी नगरसेवकाबरोबर नव्हते. तुम्‍ही पाहिलेले महापौर पदाचे स्वप्न भंगल्यामुळे तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे. म्‍हणून तुम्‍ही महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावर बेताल आरोप करीत आहात. नगरची जनता तुमच्‍या भूलथापांना बळी पडणार नाही.

तुम्ही कारकिर्दीचे आत्मपरीक्षण करा
बाबासाहेब वाकळे हे भाजप पक्षाशी एकनिष्‍ट राहिल्‍यामुळे गटनेता, सभागृह नेता, दोनदा स्‍थायी समितीचे सभापती व 14 भाजपाचे नगरसेवक निवडून आलेले असताना शहर विकासासाठी सर्वपक्षिय नगरसेवकांनी पाठींबा देवून महापौर केले. तुम्ही तुमच्या पाच टर्मच्या कारकिर्दीचे आत्‍मपरिक्षण करावे. तुम्‍ही काय मिळवले आणि काय गमविले? महापौर वाकळे यांनी संपूर्ण शहरासाठी 100 कोटी रूपयांचा निधी आणला. उर्वरित 200 कोटी रूपये सुध्‍दा लवकरच मिळणार आहेत, असे पत्रकात म्हटले आहे.
आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची

You might also like