पर्यटन स्थळांच्या विकासामुळे तरूणांना मिळेल रोजगार : पर्यटन विकासमंत्री रावल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनालाइन –छोट्या मोठ्या देवस्थांनचा विकास झाला तर पर्यटनास चालना मिळेल. गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा यामुळे विकास होईल. या माध्यमातून गावातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल असे, प्रतिपादन पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथील सुप्रसिद्ध असलेल्या गोरक्षनाथ गड व वारूळवाडी मिरावली पहाड या धार्मिक ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी रावल बोलत होते. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, संदीप कर्डिले, रेवनाथ चोभे, संतोष म्हस्के, दिपक लांडगे, गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव कदम, सरपंच जालिंदर कदम, महेश भराडिया, पचायत समिती सदस्य विलास शिंदे, दिलीप भालसिंग, बन्सी कराळे, रावसाहेब साठे,दिपक कार्ले, बबन आव्हाड, कैलास पटारे, रभाजी सुळ,संभाजी पवार, सर्वजनिक बांधकाम विभाचे कार्यकारी अधिकारी राऊत, उपअभियंता राजभोज, तुकारम कदम,पोलीस निरीक्षक मोहन बोरसे आदी उपस्थित होते.

गोरक्षनाथ गडावर (मांजरसुंबा) भक्तीनिवास बांधकाम, पुरुष-महिला शौचालय, तलावाभोवती जिन्याचे बांधकाम, संरक्षण भिंत, वाहनतळासाठी पेव्हींग ब्लॉक, बागबगिचा व वृक्षारोपण व गोशाळेची सुधारणा अशा प्रकारच्या विकास कामांचे भूमीपूजन पर्यटक विकास मंत्री रावल यांच्या हस्ते झाले.

आ. कर्डिले म्‍हणाले की, प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत विकास कामांमुळे आता भाविकांना गोरक्षनाथ गडावर उत्तम सुविधा मिळणार आहे. गोरक्षनाथ गडाप्रमाणेच हिंदु व मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मिरावली पहाडावर विविध प्रकारची विकास कामे मंजूर झाली आहे. मिरावली पहाडावर कोट्यावधी रुपये खर्चुन प्रसादालयाची इमारत बांधण्यात येणार आहे. कब्रस्तान अंतर्गत संरक्षण भिंत,पेव्हींग ब्लॉक बसविणे, वारुळवाडी ते मिरावली पहाड दर्गा रस्त्याचे डांबरीकरण, स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा या योजनेचा लोकार्पण सोहळा पार पडला.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like