अहमदनगर : स्टेट बँकेला गंडविणारे ३ अटकेत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – स्टेट बँकेच्या एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड करून त्यांना गंडवणाऱ्या महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. आज भिंगार कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली.

विरेंद्र अयोध्या प्रसाद यादव (वय 27 वर्षे, रा. धरमंगलपूर ,पोस्ट नरवल जि.कानपूर, उत्तर प्रदेश, ह. रा. कांदीवली मुंबई), पवन पुंडलीकराव जिवरख (वय 23 वर्षे, रा. जाधववाडी ,सूर्यवाडी हार्सूल, औरंगाबाद), श्वेता कमलेशसिंग (वय 25 वर्षे, रा. कांदिवली) ही अटक केलेल्यांची नावे आहेत.

दि. 05 एप्रिल 2019 ते 22 मे 2019 रोजीचे दरम्यान कोणीतरी अज्ञात गुन्हेगारांनी भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील ए.टी.एम.मध्ये तांत्रीक बिघाड करुन ए.टी.एम. मधून सुमारे 18 लाख 92 हजार 500 रुपयांची रोकड लंपास करुन बँकेची फसवणुक केली होती. याबाबत स्टेट बँकेचे मॅनेजर मेघाशाम मारोतराव इंजेवार यांनी दि. 2 जुलै रोजी भिंगार कँप पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.वि. कलम 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

त्यावरुन भिंगार कँप पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांनी तपासाची चक्रे फिरवून तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा कबुल केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सदर आरोपींना उत्तरप्रदेश
येथील साथीदार असल्याचे कबूल केले आहे.
वरील आरोपी यांना जेरबंद करणेकरीता स.पो.नि.राजपुत व त्यांचे तपास पथकातील
कर्मचारी तपासी अंमलदार उपनिरीक्षक एस. के. बेंडकोळी, सफौ.राजेंद्र गायकवाड, पो. हेड. कॉ. भाऊसाहेब अघाव, पो. हेड. कॉ. अजय नगरे, पो.ना.राजू सुद्रीक, पो. ना. अंबादास पालवे, पो.कॉ. राजेंद्र व्दारके, पो. कॉ. सुभाष पाटील, महिला पो.कॉ. मोहीनी कर्डक, म. पो. कॉ. प्रियंका राऊत आदींना आरोपींना अटक केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या