अहमदनगरमध्ये पोलिसांचा ‘ब्ल्यू डायमंड’वर छापा, आणखी एका ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील स्वस्तिक चौक परिसरातील मसाज पार्लर मध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने पर्दाफाश केला. पथकाने एक पुरुष व एका महिलेस ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागताच इतर ग्राहक पळून गेले. आज रात्री साडेआठ वाजता ही कारवाई करण्यात आली. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरू असलेल्या या सेक्स रॅकेटमुळे खळबळ उडाली आहे.

प्रदीपकुमार गोपालशेट्टी (रा. कर्नाटक) हे अटक केलेल्या पुरुषाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, स्टेशन रस्त्यावरील स्वस्तिक चौकात ब्ल्यू डायमंड नावाचेेेे मसाज पार्लर आहे. या मसाज पार्लरवर वेश्याव्यवसाय चालतो,.अशी माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यावरून मटके यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने ब्ल्यू डायमंड मसाज पार्लरवर छापा टाकला. या छाप्यात एक पुरुष व एक महिला सापडली.

उपअधीक्षकांच्या पथकाचा छापा पडताच इतर ग्राहक व महिला पळून गेल्या. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like