महिलांच्या गर्दीत वृद्धेचे मंगळसूत्र चोरले

अहमदनगर : पोलीसानामा ऑनलाईन –लालटाकीजवळील खाकीदास बाबामठ येथे सुरू असलेल्या सप्ताहाच्या कार्यक्रमावेळी वृद्ध महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पद्मावती गोपीनाथ भांबरे (वय ७७, रा. झारेकरगल्ली, नालेगाव, नगर) या खाकीदासबाबा मठ येथे सप्ताहास गेल्या होत्या. या सप्ताहासाठी पद्मावती भांबरे या ४ जून रोजी रात्री 8 वाजता आल्या. त्यावेळी महिलांची तेथे गर्दी होती. त्याचवेळी अज्ञात महिलेने पद्मावती भांबरे यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन चोरली.

याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पद्मावती भांबरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.