‘चौंडीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या’ खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चौंडी येथील जन्मस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली. होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन केल्यानंतर बोलताना खा. भोसले म्हणाले की, या स्मारकाच्या माध्यमातून त्यांचे विचार जिवंत राहतील. भावी पिढीला ते प्रेरणादाई ठरेल. याबाबत महाराष्ट्र सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

अहिल्याबई होळकर यांचे जन्मगाव राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी पालकमंत्री राम शिंदेंनी पुढाकार घ्यावा, असेही उदयनराजे म्हणाले. धनगर समजाव्यतिरीक्त सर्वच समाजाची ही मागणी आहे. ज्यांनी ज्यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले. त्यांची स्मारके व्हावी, यातून तरुणांनी बोध घ्यावा, असेही खा. उदयनराजे भोसले म्हणाले.