home page top 1

सेवानिवृत्‍त पोलीस हवालदाराकडून लाच घेणार्‍या SPऑफीसमधील लिपीकास सक्‍तमजुरी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सेवानिवृत्त पोलीस हवालदाराकडून एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील विरिष्ठ लिपीकास पाच वर्षाची सक्तमजुरी व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विनोद श्रीकृष्ण वानखेडे असे शिक्षा झालेल्या लिपीकाचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही.व्ही. बांबर्डे यांनी हा निकाल दिला आहे.

रावसाहेब भिकू साळे हे पोलीस दलातून हवालदार म्हणून २०१४ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या सेवाकाळातील तीनशे दिवसांच्या हक्काच्या रेजेचे २ लाख ३१ हजार रुपयांचे बील पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रलंबित होते. वरिष्ठ लिपीक वानखडे याने पाच हजार रुपये दिल्या शिवाय दाखला देणार नसल्याचे साळे यांना सांगितले. साळे यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे याची तक्रार दिली होती. यानंतर लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सापाळा रचून वानखेडे याला एक हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

या गुन्ह्याचा तपास करून आरोपी वानखेडे विरुद्ध न्यायायालयात दोषारोपपत्र दाखल करुन खटला चालवण्यात आला. पडताळणी पंचनामा व यशस्वी लाचेचा सापळा दोन्ही वेळेस व्हॉइस रेकॉर्डर वापरण्यात आल्याने न्यायालयात हा पुरावा ग्राह्य धरण्यात आला. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने चार साक्षीदार तपासण्यात आले. नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी तत्कालीन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पाच वर्षांची सक्तमजुरी व दोन हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. या खटल्यात सरकारी पक्षाला महिला पोलिस संध्या म्हस्के व पोलिस पैरवी महेश जोशी यांचे सहकार्य मिळाले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल घोडके यांनी बाजू मांडली.

आरोग्य विषयक वृत्त-
किमोथेरपी म्हणजे काय ? ती कर्करुग्णांसाठी वरदान ठरते का ?
महिलांनो, नॅचरल ग्लो हवाय? मग अवश्य करा ‘हे’ उपाय
सौंदर्य वृद्धीसाठी प्राचीन काळापासून केले जाता ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Loading...
You might also like