अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे 5 जण गजाआड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या 5 जणांना नागपूर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही करावाई शुक्रवारी (दि.22) रात्री रामटेक हद्दीमध्ये हिवरा बाजार ते रामटेक या मार्गावर केली. या कारवाईत 75 लाख रुपयांचे टिपर आणि 84 हजार रुपयांची रेती असा एकूण 75 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस रामटेक हद्दीमध्ये गस्त घालत असताना हिवरा बाजार ते रामटेक या मार्गावरुन तीन टिपरमधून अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेने या मार्गावरील जैन मंदिराजवळ नाकाबंदी करून तीन टिपरमध्ये विनापरवाना रेतची वाहतुक करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक करुन गुन्ह्यात वापरलेले तीन टिपर जप्त केले.

या कारवाईमध्ये अहसान खान वल्द इसराईल खान (वय-24 रा. रोशन बाग, खरबी, जि. नागपूर), मोहम्मद अ‍ॅनाजुल खान (वय-32 रा. खरबी), मोहम्मद मिहाज खान वल्द मोहम्मद हजरत खान (वय-23 रा. बालू जि. लातेहर, झारखंड सध्या रा. खरबी), वाहन मालक शोहेब अन्सारी (वय-35 रा. हसनबाग, नागपूर), रविकुमार तापेश्वर चौधरी (वय-22 रा. खरबी जि. नागपूर) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते, पोलीस हवालदार राजेंद्र सनोडीया, नाना राऊत, दिनेश आधापूरे, पोलीस शिपाई अमोल वाघ, सहायक फौजदार साहेबराव बहाळे यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com