Exit Poll 2019 : नांदेडमध्ये अशोक चव्हाण ‘गड’ राखणार ?

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) – Exit poll काही असो विजयाच्या अगोदर तिन्ही मुख्य उमेदवारांची जय्यत तयारी? नांदेड मध्ये चुरस झाली असली तर विजयाचा खरा शिल्पकार कोण असणार ह्यासाठी सर्वांचे लक्ष वेधून आहे. अशोक चव्हाण मागील निवडणूकीत मोदी लाटेतही कॉंग्रेसचा गड राखण्यात यशस्वी झाले होते. परंतु यावेळी मतदार राजाच्या मनात काय होतं? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सतराव्या लोकसभेसाठी घेण्यात आलेल्या सात टप्यातील प्रदीर्घ निवडणुकीचे निकाल २३ मे २०१९ रोजी लागत आहेत. नांदेड जिल्ह्यात वारे अशोक चव्हाण यांच्या बाजूने वाहीले असे चित्र दिसत असले तरी काही ठिकाणी काँग्रेसला धक्का सहन करावा लागेल असे exit poll मधून दिसते आहे. नांदेडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा भाजपच्या चिखलीकरांना बळ देणारी ठरली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल तीन सभा घेतल्या. त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर यांना लोकसभेची संधी मिळेल का ?

त्यात वंचित बहुजन आघाडीनेदेखील चांगली टक्कर दिली. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना जबरदस्त धक्का वंचित फॅक्टरने दिला आहे. खासदार म्हणून प्रा. यशपाल भिंगे निवडून येतील असंही दिसतंय. त्या मुळे अशोक चव्हाण यांचा अशोक पर्व नष्ट होणार का अशी चर्चा सध्या जोर धरून आहे.

भोकर येथील सभेत अशोक चव्हाण यांनी मतदारांना सांगितले की, वड्याचं तेल वांग्यावर टाकू नका. माझ्या पक्षातील कुठल्या कार्यकर्त्यांनी चुका केल्या असतील तर त्यांची शिक्षा मला देऊ नका. निवडणूक झाल्या नंतर मी त्यांच्याबद्दल विचार नक्की करेन असे अशोक चव्हाण यांनी सभेत म्हणाले होते. त्यामुळे जर अशोक चव्हाण यांचा पराभव झाला तर यालाकारण काय याचीही चर्चा जोर धरू लागली आहे.

अशोक चव्हाण यांचा विजय निश्चित का? काही exit poll वर अशोक चव्हाण यांचा दारुण पराभव तर काही exit poll वर अशोक चव्हाण विजयाचे शिल्पकार असे दाखवले जात आहे. परंतु सर्व उमेदवारांचे भविष्य २३ मे पर्यंत बंद असलेल्या EVM मशीनमध्ये आहे. विजय कुणाचा झाला. हे २३ मे रोजी कळणार आहे.