मला शिवसेनाला डिवचण्यासाठी निवडलं असेल तर जोरात डिवचाव – नारायण राणे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे सरकार येईल की नाही, याबद्दल स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांनी आपला अंदाज वर्तवला आहे. केंद्रात भाजपच्या 200 जागा येतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तसंच शिवसेनाला डिवचण्यासाठी निवडलं असेल तर जोरात डिवचायला पाहिजे. शिवसेनासारख्या पक्षाला याचा काहीही फरक पडत नाही. सेना सत्तेतून बाहेर पडत नाही. त्यांना किक मारूनच बाहेर काढावे लागणार आहे अन्यथा ते बाहेर पडणार नाही, अशा शब्दात स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे केली.

यावेळी बोलतांना निलेश राणे यांनी बाळासाहेबांविषयी जे वादग्रस्त वक्तव्य केलं होत त्याबद्दल नारायण राणे यांना विचारल असता माझ्या मुलाने जे बोललं ते चुकीचं नाही. माझ्याबद्दल शिवसेनेच्या नेत्यांनी अनेक आरोप केले. त्यामुळे माझ्या मुलाला राग येणे साहजिकच आहे. त्याने ज्या भाषेत उत्तर दिले ते कुणीही देऊ शकतं. शेवटी तो राणेंचा मुलगा आहे, असं म्हणत नारायण राणे यांनी निलेश राणे यांची जोरदार पाठराखण केली. परंतु, आनंद दिघे यांच्या प्रकरणावर तुमचं काय मतं आहे? असा सवाल केला, असता त्यांनी याबद्दल बोलण्यास नकार दिला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us