नवीन खासदारांना मोदींचा सल्ला : प्रसिद्धीपासून दूर राहा, ती ‘नशा’ तुमचा ‘नाश’ करेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या अध्यक्षाला जेवढी मतं मिळाली तेवढी तर २०१९ च्या निवडणुकीत आपल्या मतांमध्ये मध्ये वाढ झाली आहे. गठबंधनचं राजकारण महत्त्वाचं आहे. एनडीएचा प्रयोग आणखी यशस्वी करायचा निर्धार मोदींनी व्यक्त केला. त्यासोबतच नवीन खासदारांनी प्रसिद्धीच्या मोहापासून दूर राहावे, प्रसिद्धीची नशा तुमचा नाश करेल असे पंतप्रधान मोदींनी म्हंटले आहे. मोदींची रालोआच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर रालोआच्या खासदारांशी त्यांनी संवाद साधला.

पंतप्रधान मोदींनी महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं असल्याने नारीशक्तीचे आभार मानले. भारताच्या इतिहासात प्रथमच इतक्या महिला खासदार निवडून आल्या आहेत. नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये केलेले सगळे रेकॉर्ड नरेंद्र मोदींनीच २०१९ मध्ये तोडले असं मोदी यांनी म्हंटल आहे. जनता जनार्दन ईश्वराचं रूप असतं. ज्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला व ज्यांचा विश्वास मिळवायचाय अशा दोघांसाठी काम करणार आहे, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले आहे. एनर्जी व सिनर्जी या एनडीएच्या हातातील महत्त्वाच्या दोन गोष्टी असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.