पंतप्रधान नरेंद्र मोदी उलटं ‘घड्याळ’ का घालतात ? ; जाणून घ्या कारण..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मुलाखत दिली. विशेष म्हणजे हि मुलाखत बॉलीवूड अ‍ॅक्टर अक्षय कुमार याने घेतली. या मुलाखतीतून मोदींनी त्यांच्या आयुष्यातील घडामोडी सांगितल्या. त्याचबरोबर मोदींनी अक्षयला आपल्या आवडी-निवडी बद्दलही सांगितले आणि मनसोक्त गप्पा मारल्या. या मुलाखतीमध्ये मोदींनी अक्षयला त्यांचे एक गुपित सांगितलं, ते म्हणजे ते उलटं घड्याळ का घालता.

अक्षयने मुलखतीत मोदींना एक प्रश्न केला, कि मी तुम्हाला खूप वेळेस बघितले तुम्ही घड्याळ उलटं घालता, म्हणजे घड्याळाचे डायल आतल्या बाजूला असते असं का?’ त्यावर मोदींनी अक्षयला आपले गुपित सांगितले. मोदी म्हणाले, ‘मी अनेकदा मीटिंगमध्ये असतो. त्यावेळी किती वेळ झाला हे पाहण्यासाठी जर मी भेटायला आलेल्या व्यक्तीसमोर घड्याळ पाहिलं तर माझ्या या वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकतं. म्हणूनच मी उलट्या पद्धतीने घड्याळ घालतो असे मोदी म्हणाले. अशा अनेक गोष्टी मोदींनी मुलाखतीदरम्यान सांगितल्या व त्यांनी अक्षय सोबत दिलखुलास गप्पा मारल्या.