…म्हणून नरेंद्र मोदींवरच झाला ‘सर्जिकल स्ट्राईक’

डिजिटल कॅमेरा आणि ई-मेलच्या दाव्याची उडविली खिल्ली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका न्यूजन चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढगाळ वातावरणामुळे आपली विमाने रडारवर दिसू शकणार नाहीत, त्यामुळे मीच बालाकोटवर हल्ला करायचा सांगितले असे विधान केले. या विधानामुळे देशभर कल्लोळ उडाला असून त्यांच्या या अगाध ज्ञानाची खिल्ली उडविली जात असून लोकांनी मोदींवर आता सर्जिकल स्ट्राईक केला आहे. हवाई दलातील अनेक माजी अधिकाऱ्यांनी मोदींचे हे वक्तव्य हस्यास्पद असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसच्या मुंबईतील उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोडकर हिने मोदींना सणसणीत टोला लगावला आहे. उर्मिला यांनी त्यांच्या कुत्र्यासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो डोंगरावर काढण्यात आला आहे. आकाश निरभ्र असल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. यामुळे माझा कुत्रा रोमियोच्या कानापर्यंत रडारचे सिग्नल अगदी स्पष्टपणे पोहोचतील. या ट्विटसोबत तिने एक फनी इमोजीदेखील जोडला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोदींना शालजोडीत ठेवून दिले आहे. ते त्यांनी सांगितले की, युनोमध्ये आता एक ठराव झाला आहे की, आता कोणालाही युद्ध करायचे असेल तर त्यांनी ते पावसाळ्यात करावे. त्यामुळे कोणत्या देशाने कोणावर बॉम्ब टाकला हे कळणार नाही. हे नवीन तंत्रज्ञान आता विकसित झाले असून त्याचे जनक मोदी आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही यावर भाष्य केले आहे. मोदींजीच्या या शोधामुळे जगभरातील नागरी वैमानिक चिंतेत आहेत. ढगात जर विमान रडारवर दिसले नाही़ किंवा रेडिओ तरंग तिथे पोहचलेच नाहीत तर एअर ट्रॉफिक कंट्रोल त्यांना योग्य दिशा, उंची आणि बाकीची आवश्यक माहिती सांगणार कशी?. जून महिन्यांपासून ते सप्टेंबरपर्यंत मान्सूनमुळे देशातील सगल्या विमानसेवा बंद ठेवाव्या लागतील बहुदा ! पण घाबरु नका, या सगळ्या प्रश्नांवर आज तकच्या अंजना ओम कश्यप (२००० च्या नोटेत चीप असणाऱ्या फेम) यांनी त्यांच्याकडील जमिनीखाली २०० फुटांवरच्या नोटा शोधणारी रडार भारत सरकारला देण्याचा वादा केलेला आहे.

मोदींनी ते वक्तव्य हटविले

बालाकोट हवाई हल्ल्याबाबत मोदी यांनी रडारविषयी केलेले विधान भारतीय जनता पक्षाने ट्विटरवर केले होते. त्यावर काँग्रेससह विरोधकांनी जोरदार टिका केली होती. सामान्य लोकांकडूनही यावर खिल्ली उडविली जात आहे. हे पाहून आता भारतीय जनता पक्षाने मोदींचे हे वक्तव्य आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हटविले आहे. आपल्याच पंतप्रधानांचे वक्तव्य पक्षाच्या ट्विटरवरुन हटविण्याची नामुष्की भाजपवर आली आहे.

Loading...
You might also like