विरोधकांनी उडवली पंतप्रधान मोदींच्या देवदर्शनाची ‘खिल्ली’, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाराणसी मतदारसंघात मतदान होत असताना आपल्या पंतप्रधानपदाचा उपयोग करुन नरेंद्र मोदी यांनी शासकीय पदाचा वापर करीत देवदर्शनातून मतदारांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ते मतदारांना काय संदेश देऊ इच्छितात, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

वाराणसीसह पूर्व उत्तर प्रदेश तसेच ७ राज्यातील ५९ मतदारसंघात शेवटच्या टप्प्यातील रविवारी मतदान होत आहे. वाराणसीत स्वत: मोदी निवडणुक लढवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी जाणीवपूर्वक हा देवदर्शनाचा दौरा आयोजित केला असून भगवे उपरणे लपेटून ध्यानधारणा करीत असल्याचे फोटो सर्वत्र पोहचविले आहे. त्यातून ते मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टिका केली जात आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मोदी यांच्या या देवदर्शनाची खिल्ली उडविली आहे. ते म्हणाले, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, अर्थव्यवस्था आणि परदेश निती अशावरुन मतदारांचे लक्ष उडविण्यासाठी मोदींकडून हे सर्व चालू आहे. भगवे उपरणे घेऊन एका गुहेत ध्यानधारणा करीत असलेले फोटो सर्वत्र पाठवून मोदी मतदारांचे ध्रुवीकरण करीत आहेत. त्यातून त्यांना काय संदेश द्यायचा आहे. महबुबा मुफ्ती ने पंतप्रधान मोदी यांच्या केदानाथ यात्रेवर ‘मै (औरएएनआय) मेरी तन्हाई मे अकसर ये बात करते है’ अशा शब्दात टिका केली आहे.