पंतप्रधान मोदींनी नावामागील ‘चौकीदार’ शब्द हटवला ; समर्थकांनाही नाव हटवण्याचं केलं आवाहन

पोलिसनामा ऑनलाईन टीम : देशभर भाजपला प्रचंड यश मिळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटरवरच्या नावामागील चौकीदार हा शब्द काढून टाकला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हंटले आहे की, आता चौकीदार हा शब्द काढून टाकण्याची वेळ आली आहे. चौकीदार शब्द ट्विटरवरून जरी हटवला असला तरी तो माझा कायम अविभाज्य भाग असेल. तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही देखील अशीच कृती करा.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘चौकीदार चोर है’ या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून मै भी चौकीदार हि मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेचा एक भाग म्हणून भाजपच्या सर्व नेत्यांनी तसेच समर्थकांनी त्यांच्या ट्विटरवरील नावाआधी चौकीदार असे नाव लावले होते.

मोदी यांनी समर्थकांनाही चौकीदार नाव काढून टाकण्याचे आवाहन केले आहे. राहुल गांधी राफेल प्रकरणावरून नरेंद्र मोदी यांच्यावर सात्यत्याने ‘चौकीदार चोर है’ अशी घोषणा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत होते. राहुल गांधी यांच्या सभेत सासतत्याने चौकीदार चोर है अशा घोषणा देण्यात येत होत्या. सध्या भाजपला मिळत असलेल्या प्रचंड यशामुळे नरेंद्र मोदी यांनी नावामागील चौकीदार शब्द हटवल्याचे बोलले जात आहे.