मतांच्या ‘जोगव्या’साठी दुष्काळी भागात मोदी, ठाकरे ?

दुष्काळी भागातील सभे बद्दल काय आहे शेतकरी आणि तरुणांच्या मनात

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन (विष्णू बुरगे) – एकमेकांवर चिखलफेक केल्यानंतर शिवसेना आणि भाजपा आता लोकसभा निवडणूकीत एकत्र रॅली करणार आहेत. वेगवेगळ्या मंचावरून एकमेकांनिषयी जे शिवराळ भाषेचा वापर करत होते. ते आता एकाच मंचावरून विरोधकांना ललकारणार आहेत. लातूरमध्ये मतांचा जोगवा मागण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असून लातुर आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यातील उमेदवाराच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे औसा येथे ९ एप्रिलला सभा घेणार आहेत.

लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मागील पाच वर्षात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. लातूरमध्ये अनेकवेळा शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी या प्रश्नांवरून आंदोलन केली आहेत. आता नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र जी नेतेमंडळी असे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी आले नाहीत. ते आता मतांचा जोगावा मगण्यासाठी येत आहेत. तेव्हा ते आता तरी या प्रश्नांवर बोलतील का असा सवाल शेतकरी आणि नागरिक विचारत आहेत. तर जेंव्हा आम्हाला गरज होती तेव्हा तर कोणीही आले नाही. असा सवाल विचारला जात आहे. आता ते मतांसाठी येत आहेत.

तसंच पुन्हा येऊन आमचे प्रश्न सोडवावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. लातूर जिल्ह्यातील नवनाथ शिंदे या शेतकऱ्यानं आपली भूमिका मांडली आहे. हीच भूमिका इतर शेतकऱ्यांची आहे. मात्र पुन्हा पाच वर्षे सत्ता सोपवून त्यांची वाट लोक पाहतील अशी भीती ही त्यांनी व्यक्त केलीय.

मोदींचा दौरा हा त्यांना पंतप्रधान बनविण्यासाठी, दोन मतं पक्की करण्यासाठी ते येत आहेत. त्यांना स्थानिक प्रश्नाचं घेणे देणे नाही. आता पुन्हा मोदी यांना प्रधानमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या या दुष्काळी दोन्ही जिह्यात येत आहेत. या दोन्ही जिल्ह्याबद्दल स्थानिक प्रश्नांच त्यांना घेणे देणे नाही असं मत अमोल जाधव या युवकाने व्यक्त केलं आहे.