नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात असू शकतो ‘या’ लोकप्रिय चेहऱ्यांचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर आज नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विक्रमी ३५३ जागा जिंकून विरोधी पक्षांना धूळ चारली. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपमध्ये या शपथविधी सोहळ्यासाठी उत्साह दिसून येत आहे. या बरोबरच मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी देखील होणार असल्याचेच समजते. २०१४ च्या तुलनेत यावेळी मोदींच्या टीममध्ये तरुण मंत्र्यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांना मंत्रिमंडळात गृहमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गेल्यावेळी गृह खाते सांभाळणाऱ्या राजनाथ सिंग यांना कृषिमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्री

१) गृह मंत्री अमित शाह
२) सरंक्षण मंत्री राजीव प्रताप रूडी
३) क्रीडा मंत्री गौतम गंभीर
४) रेल्वे मंत्री पीयूष गोयल
४) विदेश मंत्री स्मृति ईरानी
५) मनुष्यबळ विकास मंत्री निर्मला सीतारमण
६) परिवहन मंत्री नितिन गडकरी
७) कृषि मंत्री राजनाथ सिंह
८) अर्थ मंत्री जयंत सिन्हा
९) वाणिज्य मंत्री वरुण गांधी
१०) उद्योग मंत्री अरविंद सावंत
११) अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नकवी
१२) सूचना आणि प्रसारण मंत्री बाबुल सुप्रियो
१३) पेट्रोलियम मंत्री किरेन रिजिजू
१४) परिवार और कल्याण मंत्री अनंत कुमार हेगडे
१५) ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान
१६) महिला सशक्तिकरण मंत्री मीनाक्षी लेखी
१७) शहरी विकास मंत्री गोपाल शेट्टी
१८) कायदा मंत्री रविशंकर प्रसाद
१९) खाद्य मंत्री चिराग पासवान
२०) पर्यटन मंत्री अनुराग ठाकुर
२१) आरोग्य मंत्री जेपी नड्डा
२१) खनिज मंत्री गिरिराज सिंह
२२) पर्यावरण मंत्री सदानंद गौडा

त्याचबरोबर रामविलास पासवान, प्रकाश जावडेकर, अनुप्रिया पटेल, नरेंद्र सिंह तोमर, धर्मेंद्र प्रधान, आरके सिंह, राज्यवर्धन सिंह राठोड, अर्जुन सिंह, गजेंद्र सिंह शेखावत, राजीव रंजन सिंग यांचा देखिल मंत्रीमंडळात समावेश होऊ शकतो.