Exit Poll 2019 : नाशिकमध्ये ‘वजनदार’ समीर भुजबळ ‘डेंजर’ तर ‘हेवीवेट’ हेमंत गोडसे ‘सेफ’ झोनमध्ये

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झीट पोलची आकडेवारी जाहीर झाली. यामध्ये राज्यात महायुतीचा वरचष्मा दिसून येत आहे. तर आघाडीला धक्का बसताना दिसत आहे. राज्यातील माढा, सोलापूर, उस्मानाबाद, मावळ, शिरूर मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्याच प्रमाणे नाशिकमधून समीर भुजबळ डेंजर झोनमध्ये आहेत. या ठिकाणी समीर भुजबळ विरूद्ध शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यात लढत होत आहे.

महाराष्ट्र सदनासह अनेक गैरव्यवहारांप्रकरणी मनी लॉडरिंग कायद्यांतर्गत दोन वर्षे तुरुंगवास भोगलेल्या समीर भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक मतदारसंघातून उमेदवारी दिली. तर शिवसेनेने विद्यमान खासदार गोडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. २००९ च्या निवडणुकीत समीर भुजबळ यांनी हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता. त्यावेळी त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती. २०१४ च्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती. २०१४ मध्ये गोडसे यांनी समीर भुजबळ यांचा पराभव केला होता.

आता पुन्हा गोडसे आणि भुजबळ हे पुन्हा आमनेसामने आहेत. या मतदारसंघात मराठा समाजाची मते निर्णायक ठरू शकतात. मात्र समीर भुजबळ यांनी केलेल्या घोटाळ्यामुळे त्यांची प्रतिमा काहीशी मलीन झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मानणारा वर्ग समीर भुजबळ यांना उमेदवारी दिल्याने नाराज आहे. याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो. समीर भुजबळ यांची उमेदवारी मुळे नाराज असलेले कार्यकर्ते आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची अपक्ष उमेदवारी तसेच बहुजन वंचित आघाडीने उमेदवार दिल्याने या ठिकाणी चौरंगी लढत होत आहे.

नाशिक मतदारसंघातील ग्रामिण भागात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तुल्ल्यबळ समान आहे. त्यामुळे ग्रामिण भागात दोन्ही उमेदवार बोरोबरीने चालतील असे चित्र आहे. मात्र, समीर भुजबळ यांच्यावर नाराज गटाकडून या ठिकाणी दगा फटका होण्याची शक्यता आहे. याचा फायदा महायुतीच्या हेमंत गोडसे यांना होईल.

काही अपवाद वगळले तर नाशिक मतदारसंघाने सलग दुसऱ्यांदा तोच खासदार निवडून दिलेला नाही. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक अटीतटीची आहे. त्याचप्रमाणे तुरुंगातून सुटल्यानंतर समीर भुजबळ यांच्यासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. गेल्या निवडणुकीत गोडसेंनी छगन भुजबळ यांचा पराभव केला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी समीर भुजबळ यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

एक्झिट पोलच्या मतानुसार समीर भूजबळ हे डेंजर झोनमध्ये असल्याने शिवसेनेचे हेमंत गोडसे यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. मात्र, २३ मे रोजी समजेल कोण डेंजर झोनमध्ये होते आणि कोणाचे पारडे जड होते.

Loading...
You might also like