‘त्या’ फ्लेक्सवरून पुन्हा रमेश थोरात यांचा फोटो ‘गायब’, तालुक्यात ‘उलट-सुलट’ चर्चा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वीरधवल (बाबा) जगदाळे पाटील यांच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या पोस्टरवरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार रमेश थोरात हे गायब झाल्याने तालुक्यामध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे या पोस्टरवर जेष्ठ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, मा.उपमुख्यमंत्री अजित पवार आणि झेड.पी. सदस्य वीरधवल जगदाळे यांचे फोटो मात्र टाकण्यात आले असल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मागील काळातही असाच काहीसा प्रकार यवत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन मेळाव्याच्या वेळ पहायला मिळाला होता त्यावेळी दौंडचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या पोस्टरवर रमेश थोरात यांचा फोटो लावण्यात आला नव्हता त्यामुळे अजित पवारांनी भाषणामध्येच याबाबत नाराजी व्यक्त केली होती. वीरधवल जगदाळे हे दौंड चे माजी आमदार कै.बाळासाहेब जगदाळे पाटील आणि उषादेवी जगदाळे पाटील यांचे चिरंजीव असून ते दौंड शुगर कारखान्याचे संचालक आहेत. वीरधवल जगदाळे हे दौंड तालुक्यतील राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांनी तालुक्यामध्ये झालेल्या विविध राजकीय उलथापालथी मध्येसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची साथ आजपर्यंत सोडली नाही.

दिड महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेसाठी तेही इच्छुक असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना संधी देण्यात यावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. वीरधवल जगदाळे यांच्यामागे कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याने त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून विचार केला जाऊ शकतो असा कयास लावण्यात येत असून माजी आमदार रमेश थोरात यांच्या फोटो विरहित लावण्यात आलेले पोस्टर हे वीरधवल जगदाळे यांच्या प्रति आपली भावना व्यक्त करणारे असल्याचे बोलले जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते उमेश जगदाळे यांनी बोलताना गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी हे पोस्टर टाकले असून ‛तसा’ काही विषय नसल्याचे सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –